तारापूर एज्युकेशन सोसायटीची रा. हि. सावे माध्यमिक आणि प्राथमिक शाळा व गो. शि. बर्वे पूर्व प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मानानिय श्री. केसरीनाथ सावे यांच्या अध्यक्षतेखाली शाळेमध्ये आयोजीत करण्यात येत आहे.

About Us

तारापूर... मुंबईच्या उत्तरेला, पश्चिम रेल्वेच्या बोईसर स्टेशनपासुन बारा किलोमिटर अंतरावर वसलेले पुर्वीचे लहान पण आताचे विस्तारलेले टुमदार गांव. गावाच्या वैभवाची साक्ष देणारे पुर्वीचे ओळखीचे प्रशस्त वाडे आणि ऐसपैस बंगले काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मागावर असले तरिही गावाने अद्याप आपले गावपण सोडलेले नाही. आजही नारळ, आंबा, वड, चिंच, पिंपळ आणि लाज-याच्या वृक्षवल्लीने गावावर आपली थंडगार छाया पसरली आहे . २०११ च्या शिरगणतीनुसार गावाची लोकासंख्या ६९६२ इतकी आहे. गावातील साक्षरतेचे प्रमाण ९१ टक्के इतके आहे आणि महिलांचे प्रमाण पुरषांपेक्षा थोडे जास्त म्हणजे १००० पुरषांमागे १०११ रित्रया असे रित्र पुरुष प्रमाण आहे. तत्कालीन तारापूर गावाच्या शैक्षणिक प्रगतीचे श्रेय जाते ते गावाला शास्त्रीय शिक्षणाची कांस धरायला लावणा-या ब्राम्हण हितवर्धीनीसभेच्या सभेला. डिसेंबर १९४३ रोजी छबिलदास हायस्कुल मुंबई येथे झालेल्या सभेल तारापूर येथील ब्राम्हण समजाच्या सभासदांनी आपल्या गावात इंग्रजी शाळा काढायची असा संकल्प केला आणि अवघ्या एक महिन्याच्या आंत हा संकल्प तडिस नेला .... गावातील पारशी, पाचकळशी, भंडारी, मुस्लिम इत्यादी विवीध धर्म आणि ज्ञातीतील समाजधुरीणांना सोबत घेऊन सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांतुन ९ जानेवारी १९४४ रोजी तारापुर एज्युकेशन सोसायटी या संस्धेची स्थापना झाली . संस्धेच्या स्थापनेनंतर एक हंगामी यवस्थापन समिती गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणुन श्री . केकी पेस्तनजी जमादार, चेअरमन म्हणुन श्री . दत्तात्रेय गोपाळ उर्फ भाऊसाहेब बर्वे व सेक्रेटरी म्हणुन श्री . आनंद रधुनाथ बर्वे यांची निवड करण्यात आली. या पदाधिका- यांमध्ये यथावकाश अजुन काही नविन सभासदांची भर घालुन एक अस्थायी समिती निवडण्यात आली . संस्था नोंदणी होऊन संस्थेची घटनानिर्मीती झाल्यावर या अस्थायी समितीचे रुपांतार स्थायी समितीमध्ये झाले त्यानंतर आजतागायत या समितीला स्थायी समिती याच नावाने ओळखले जाते. १९५० साली संस्थेची नोंदणी होऊन पहिली स्थायी समिति निवडण्यात आली यांत मरहुम केकी पेस्तनजी जमादार ( अध्यक्ष), कै. दत्तात्रेय गोपाळ बर्वे (उपाध्यक्ष), कै. कृष्णाजी पांडुरंग बर्वे ( खजिनदार), कै. गोपाळ लक्ष्मण गजके (कार्यवाह) या चार पदधिका-यांसह सदस्य म्हणुन मरहुम जहांगिर बेहेरामशा मक्तेदार, मरहुम माणेकजी जीवनजी तारापोरवाला, कै. गोपाळ शिवराम बर्वे, कै. हिराजी विठ्ठल सावे, कै. डॉ . रामचंद्र महादेव राऊत, कै. रामचंद्र हिराजी सावे, कै. अनंतराव काशीनाथ बर्वे पै. इस्माईल पूनावाला, कै. पंढरीनाथ पाटील, कै. व्हि के. जोशी प्रिंसीपाल छबिलदास हायस्कुल अशी १४ जणांची स्थायी समिती निवडण्यात आली . संस्था स्थापनेनंतर अवघ्या तिन महिन्यात १७ एप्रिल १९४४ रोजी तारापूर इंग्रजी शाळेची स्थापना करण्यात आली व तारापूरचे प्रसिध्द नागरिक श्री . शेखअल्ली सुलेमान यांच्या हस्ते शाळेचे अनौपचारीक उदघाटन करण्यात आले. स्थापनेच्या वेळेस शाळा सध्याच्या जागेत नव्हे तर शंकराच्या देवळासमोरील चाळीच्या खोलयांमध्ये भरत असे. शंकराच्या देवळातील घंटा हाच शाळा करण्याचा व सुटण्याचा टोल होता. स्थापनेपासुन शाळेचे इंग्रजी १ ली ते ४ थी म्हणजे आताचे पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळेचे औपचारिक उदघाटन १० जुन १९४४ रोजी ठाणे जिल्हाचे तत्कालिन कलेक्टर श्री. जी. व्ही . बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले . शाळेची आरंभीची पटसंख्या १०२ होती आणि वर्गखोल्यांची संख्या ६ होती व श्री . चिंतामण सदाशिव ओळतीकर हे शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते . दिंनाक २२ एप्रिल १९४६ रोजी शाळेला इयत्ता सातवी म्हणजे मॅट्रीकचा वर्ग उघडण्यास परवानगी मिळाली . १९४६ साली सध्याच्या जागेमध्ये शाळेची पहिली भव्य वास्तु उभारण्यात आली. दिनांक ३० डिसेंबर १९४६ रोजी या वास्तुचे उदघाटन तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री श्री . बाळासाहेब खेर यांच्या हस्ते करण्यात आले . १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र होण्याच्या अगेदर संस्थेची स्वत:च्या जागेत स्वत:ची वास्तु उभी राहुन इयत्ता ५ वी ते मॅट्रीक पर्यंतची आधुनिक शिक्षण देणारी शाळा भरू लागली होती. शाळेचे नांव होते 'तारापूर एज्युकेशन सोसायटीचे हायस्कुल'.

NEWS

Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre

EVENT

Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre     Cinque Terre