ABOUT SCHOOL

तारापूर एज्युकेशन सोसायटी

पायाभूत सेवासुविधा व गुणवैशिष्ट्ये

तारापूर एज्युकेशन सोसायटी ही पालघर जिल्ह्यातील ख्यातनाम शैक्षणिक संस्था असून या संस्थेची स्थापना भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात झाली आहे. ९ जानेवारी १९४४ रोजी स्थापना झालेल्या संस्थेने सुरवातीस इयत्ता ५ वी ते मॅट्रिक पर्यंतचे हायस्कूल सुरू केले.

संस्थेच्या विविध ६ विभागांच्या ६६ क्लासरुममधून ३२०० विद्यार्थी शिकत आहेत.

• संस्था व संस्था संचलीत सर्व शाळा आणि महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी १०३ शिक्षक कार्यरत आहेत. तसेच ११ शिक्षकेतर कर्मचारी आणि १३ चतुर्थश्रेणी कर्मचारी संस्था, शाळा आणि महाविद्यालयाच्या सेवेत आहेत.

• शिक्षकांच्या शैक्षणिक सुविधेसाठी ५ स्टाफरुम असून प्राचार्य व मुख्याध्यापकांसाठी तीन स्वतंत्र कार्यालये उपलब्ध आहेत.

• संस्थेने विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी तीन अद्ययावत संगणक कक्ष उभारले असून १२५ संगणकाद्वारे इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दररोज माहिती व तंत्रज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. या तीन पैकी एक संगणक कक्ष पूर्णपणे सोलर एनर्जीवर कार्यान्वित केला आहे.

• संगणक विभागाच्या साथीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना मिळावा या हेतूने ८ डिजिटल स्मार्टक्लास देखील विद्यालयात सुरू आहेत.

• विज्ञान शाखेतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीनही विषयांसाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे ६ सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली आहे.

• रा. ही. सावे विद्यालयाच्या लायब्ररीला कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे नाव देण्यात आले आहे. या अभ्यासिकेत ६००० पेक्षा अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत.

• सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या आसनक्षमतेचे भव्य मातोश्री सभागृह बांधले असून याच्याच जोडीने सुमारे २०० आसनक्षमता असलेले रमेश भास्कर करवीर सभागृह देखील उभारण्यात आले आहे.

• लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवासात गैरसोय होऊ नये या हेतूने प्रत्येकी ४५ ते ४८ आसनक्षमतेच्या पाच स्कूल बसेस मागील चार वर्षांपासून चालविण्यात येत आहेत.

• विद्यार्थ्यांना स्वच्छ पेयजल उपलब्ध व्हावे याकरीता स्वयंचलित वॉटर प्युरिफायर प्लॅंट बसविण्यात आला आहे. सर्व ३२०० विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

• विद्यार्थीनींच्या आरोग्य रक्षणासाठी आवश्यक तेंव्हा सॅनिटरी पॅड विनामूल्य पुरविण्यात येतात.

• मागील पाच वर्षात सत्तर नवीन युरीनल व टॉयलेट ब्लॉक निर्माण करण्यात आली आहेत.

• संस्थेच्या सर्व वास्तू व परिसर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली आहे.

• संस्थेकडे तीन विशाल क्रिडांगणे असून विद्यार्थी व परिसरातील अनेक क्रिडाप्रेमी त्याचा लाभ घेत आहेत.

• वरील सर्व पसारा संस्थेच्या चार भव्य वास्तूमधून सांभाळला जात आहे.